विराट कोहली हा मेस्सीपेक्षा मोठा ब्रँड, ‘फोर्ब्स’ ची यादी जाहीर 

‘फोर्ब्स’ ने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या ‘व्हॅल्युएबल ब्रँड’मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सीला मागे टाकत ७वा क्रमांक मिळवला आहे.

मेस्सी या यादीत ९व्या स्थानी आहे तर अव्वल स्थानी टेनिसचा महान खेळाडू रॉजर फेडरर ३७.२ मिलियन या ब्रँड व्हॅल्युसह आहे.

कोहलीची  व्हॅल्यु ही १४.५ मिलियन डॉलर आहे तर मेस्सीची १३.५ मिलियन डॉलर एवढी. या यादीतील अन्य खेळाडूंमध्ये लेब्रॉन जेम्स ३३.४ मिलियन ब्रँड  व्हॅल्युसह दुसरा तर उसेन बोल्ट २७ मिलियन डॉलरसह तिसरा आहे.

फुटबॉल जगतातील ख्रिस्तियानो रोनाल्डो हा यादीत चौथा असून त्याची  ब्रँड  व्हॅल्यु आहे २१.५ मिलियन डॉलर आहे.