कुंबळे- कोहलीमध्ये मतभेद! माहित करून घ्या काय असेल या मतभेदाच कारण?

भारतीय संघ ह्या आठवड्यात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जरी इंग्लंड येथे गेला असला तरी टीममध्ये सर्वच काही ठीक सुरु आहे असे नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी गतविजेते असलेला संघ ह्या वर्षी विजेतेपदासाठी जरी प्रयत्न करत असला तरी कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वाद मोठ्या प्रमाणावर मेडियामध्ये चर्चेचा विषय आहे.

कुंबळे- कोहलीमध्ये वाद
मीडिया रिपोर्ट्सनुसार कोहलीबरोबरच संघातील जेष्ठ खेळाडूसुद्धा प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर नाराज आहे. कुंबळे संघात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळेच खेळाडूंनी याची तक्रार बीसीसीआयकडे सुद्धा केली आहे. खेळाडूंच्या म्हणण्यानुसार कुंबळे खेळाडूंना ड्रेसिंग रूम मध्ये जास्त स्वातंत्र्य देत नाहीत. त्यामुळे भारताच्या या माजी कर्णधाराच्या वागण्याला आता खेळाडू कंटाळले आहेत.

काही मेडिया रिपोर्ट्स प्रमाणे कुंबळे आणि कोहली या दिग्गज क्रिकेट पर्सनॅलिटी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांच्यात अहंकार युद्ध सुरु आहे.

बीसीसीआय कुंबळेवर नाराज
मुख्य प्रशिक्षक असलेल्या भारताच्या या माजी कर्णधाराने वेळोवेळी खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसेच स्वतःच्या वेतनवाढीबद्दल भाष्य केले आहे. त्यामुळेच बीसीसीआयने कुंबळेचा करार न वाढवता नव्याने या पदासाठी अर्ज मागवले आहेत. त्यामुळे कुंबळेला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे.

कोहलीची सचिनशी चर्चा
भारतीय संघासाठी सचिन अ बिलियन ड्रीम चित्रपटाचा खास प्रीमियर मुंबईमध्ये ठेवला होता. त्यावेळी काही रिपोर्ट्स नुसार कोहलीने त्याच्या आणि कुंबळेमध्ये असलेल्या वादाबद्दल सचिनला कल्पना दिली. आणि बीसीसीआयने लगेच २५ तारखेला प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले.

कुंबळे प्रशिक्षक असताना भारताने कोहलीच्या नेतृत्वाखाली जवळजवळ सर्वच स्पर्धा जिंकल्या आहेत. कोहली-कुंबळे जोडीचं मैदानावरील १ वर्ष जरी चांगलं गेल असल तरी मैदनाबाहेरील वाद आता चव्हाटयावर येऊ लागले आहेत.