परदेश दौऱ्यात पत्नीला सोबत घेऊन जाण्यासाठी खेळाडूंना परवानगी द्यावी, विराट कोहलीची बीसीसीआयला विनंती

संपूर्ण परदेश दौऱ्यात क्रिकेटपटूंना त्यांची पत्नीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियमक मंडळाकडे (बीसीसीआय) केली आहे.

याबद्दल इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार एका सुत्राने सांगितले की ‘ही विनंती काही आठवड्यांपूर्वी करण्यात आली होती. पण बीसीसीआयच्या पॉलिसीनुसार पहिल्यांदा व्यवस्थापकाने याबद्दल अधिकृत विनंती दाखल करावी लागेल.’

‘अनुष्का विराटबरोबर परदेश दौऱ्यवर जाते. त्यामुळे आता जूना नियम बाजूला सारत नवीन नियम करावा, असे विराट इच्छित आहे. ज्यामुळे खेळाडूंच्या पत्नी त्यांच्यासोबत परदेश दौऱ्यात प्रवास करु शकतील.’

बीसीसीआयच्या सध्याच्या नियमाप्रमाणे 45 दिवसांच्या परदेश दौऱ्यात दोन आठवड्यांनंतर भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी त्यांच्याबरोबर 14 दिवसांसाठी सोबत राहु शकतात.

असे असले तरी विराटची पत्नी ही भारताच्या मागील महिन्यात पार पडलेल्या संपूर्ण इंग्लंड दौऱ्यात इंग्लंडमध्ये होती. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

भारताच्या अन्य क्रिकेटपटूंच्या पत्नी या इंग्लंडमधून मर्यादीत षटकांच्या मालिकांनंतर पुन्हा परतल्या होत्या. परंतू अनुष्का इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेदरम्यानही थांबली होती.

भारतीय संघ सध्या मायदेशात विंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. पण नोव्हेंबर महिन्यात भारताचा संघ आॅस्ट्रेलिया दौरा करणार आहे.

त्यामुळे आता विराटच्या या विनंतीवर बीसीसीआयची सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेली समिती यावर काय निर्णय घेते हे पहावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

विराट कोहली आणि टीम इंडियाकडून शिकण्याचा विंडिजला फायदा होईल

…आणि कुलदीप यादव बनला समालोचक; केले स्वत:च्या गोलंदाजीचे समालोचन

प्रो-कबड्डीच्या ६व्या हंगामाचा उद्घाटनाचा सामना रंगणार या दोन संघात