पुन्हा विराट कोहली- गौतम गंभीरमध्ये या मुद्द्यावरुन वाद?

जेव्हा संघ परदेश दौऱ्यावर असतो तेव्हा खेळाडूच्या पत्नीला सोबत न्यायला परवानगी असावी, अशी विंनती भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयला केली आहे.

बीसीसीआयच्या सध्याच्या नियमानुसार खेळाडूंना 45 दिवसांच्या दौऱ्यात पहिल्या दोन अाठवड्यानंतर १४ दिवसांसाठी पत्नीला दौऱ्यात सोबत नेता यायचे.

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर मात्र विराटच्या या मताशी सहमत नाही. “ही वैयक्तिक बाब असून प्रत्येक खेळाडूच्या मतानुसार यात बदल होऊ शकतो.” असे गंभीरने म्हटले आहे.

“काही खेळाडूंना आपल्या परिवारासोबत वेळ घालवायला आवडतो तर काहींना थोडा वेळ परिवारासोबत घालून नंतर पूर्णवेळ क्रिकेटवर लक्ष एकाग्र करायला. त्यामुळे त्यात बदल होऊ शकतो. निर्णय कोणताही झाला तरी तो भारतीय क्रिकेटच्या फायद्याचा असावा.” असे गौतम गंभीर म्हणाला.

इंग्लड दौऱ्यात अनुष्का विराट सोबत होती. त्यावर काहींनी टीका केली होती. म्हणून विराटने हा नियम रद्द करण्याची मागणी केली आहे. विराटने जरी काही आठवड्यापूर्वी ही मागणी केली असली तरी संघ व्यवस्थापनाकडून याचा प्रस्ताव बीसीसीआयकडे जात असतो. त्यामुळे यावर निर्णय होणे अजून बाकी आहे .

महत्वाच्या बातम्या-