विराट कोहलीचा महिन्याचा पिण्याच्या पाण्याचा खर्च ३६ हजार रुपये…

नवी दिल्ली: भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहली रोज विक्रम करतोय. परंतु हा नवा विक्रम ऐकून आपण अवाक व्हाल. भारताच्या या कर्णधाराचा महिन्याचा पिण्याचा पाण्याचा खर्च अंदाजे ३६,००० रुपये एवढा आहे.
विराट कोहली जे पाणी रोज पितो ते फ्रान्सवरून येते. त्याची भारतात अंदाजे लिटरमागे किंमत आहे ६०० रुपये. एव्हियन नावाचे मिनरल पाणी विराट रोज पितो. फ्रान्स मधील ग्रामीण भागात जे नैसर्गिक झरे आहेत तिथेच हे पाणी मिळते. ह्या पाण्याच्या बाटल्या भारतात मोठ्या आणि छोट्या प्रकारात मिळतात. छोटी बाटली अंदाजे २४० रुपयांना मिळते.


भारताचा हा कर्णधार आपल्या आहाराबद्दल अतिशय काळजी करणारा आहे. जेव्हा तो कुठेही बाहेर जातो तेव्हा ह्याच ब्रँडच पाणी पिण्यासाठी मागतो . बऱ्याच वेळा तो स्वतःच पिण्याचं पाणी बरोबर बाळगतो.

जपान मधील कोना निगारी मिनरल वॉटर ची किंमत 26 हजार रुपये प्रति लीटर आहे. हे पाणी वजन कमी करण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी पितात. तर अजून एक जपानी फिलिक्को नावाच्या पाण्याची ७५० मिलीलिटरची बाटली १४ हजार रुपयांना मिळते.

हे महागडे मिनरल वॉटर जास्त करून खेळाडू आणि सेलिब्रिटी पितात. आजकाल भारत आणि जगात खेळाडू आणि सेलेब्रिटी हे आपल्या शरीर आणि आहाराबद्दल काहीसे अधिकच जागरूक झालेले दिसतात.