विराटची मैदानावरील थोडीशी विश्रांती आणि ट्विटरकरांचे त्यावरील गमतीशीर ट्विट

दिल्ली । येथील फिरोज शहा कोटला स्टेडिअमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात कालचा दिवस हा श्रीलंकन खेळाडूंनी केलेल्या खराब वातावरणाच्या तक्रारींमुळे गाजला होता. अखेर भारतीय कर्णधार विराट कोहलीने काल या सततच्या तक्रारींना वैतागून भारताचा डाव ७ बाद ५३६ धावांवर घोषित केला होता.

श्रीलंकन खेळाडूंच्या या तक्रारींमुळे सामन्यात सतत व्यत्यय येत होता. असाच एका व्यत्ययादरम्यान सामना पंच चर्चा करत असताना सामन्यात द्विशतक करणाऱ्या विराटने मैदानावर झोपून थोडी विश्रांती घेतली. याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. यावर क्रिकेट चाहत्यांनी अनेक कंमेंट केल्या आहेत.

याआधी असेच एकदा एमएस धोनीने श्रीलंकेविरुद्धच झालेल्या एका वनडे सामन्यात जेव्हा श्रीलंकन प्रेक्षकांमधून बाटल्या मैदानात फेकण्यात आल्या होत्या तेव्हा अशीच मैदानावर झोपून विश्रांती घेतली होती.

याबद्दल ट्विटरकरांनी विराटची मस्करी करणारे अनेक ट्विट केले. त्यात अनेक गमतीशीर ट्विट पाहायला मिळतात.

https://twitter.com/ikpsgill1/status/937237376652345344