नेहमीच उशीरा येणाऱ्या या खेळाडूला विराट देणार घड्याळ भेट

भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली सध्या त्याला मिळालेल्या विश्रांतीची मजा घेत आहे. आजच त्याने टीसोट या घड्याळ कंपनीच्या नवीन शॉप उदघाटनासाठी हजेरी लावली आहे.

या कार्यक्रमादरम्यान विराटची मुलाखत घेण्यात आली. हि मुलाखत अँकर मयंती लँगरने घेतली. या मुलाखतीमध्ये मयंतीने विराटला एक प्रश्न असा विचारला की,”तुला जर घड्याळ कोणाला भेट म्हणून द्यायचे असेल तर तू कोणाला देशील आणि कोणते घड्याळ देशील?”

या मयंतीच्या प्रश्नावर उत्तर देताना विराट म्हणाला, “मी युजवेंद्र चहलला घड्याळ भेट देईल कारण तो नेहेमी उशीर करतो. मी त्याला वेळ बघण्यासाठी कोणत्याही प्रकारचे घड्याळ देऊ शकतो.”

त्याच्या या उत्तरावर मयंतीने विराटला पुन्हा विचारले की “तुला असे वाटत नाही का त्याच्या मापाचे घड्याळ मिळायला अवघड जाईल.” त्यावर हसून विराटने सांगितले, कि “मी त्याला रबर स्ट्रॅप असलेले घड्याळ देईल कारण त्याच्या मापाची बाकी स्ट्रॅपची घड्याळ मिळणार नाही.”

सध्या विराटला श्रीलंकेत चालू असलेल्या निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व रोहित शर्मा सांभाळत आहे.