उत्तम फलंदाज असला तरी कोहलीला कर्णधार म्हणून अजून सिद्ध करायचे आहे…

चेन्नई| आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने जगातील कोणत्याही खेळपट्टीवर सहज धावा करणारा विराट कोहली एक फलंदाज म्हणून खुप यशस्वी झाला आहे. विराट बाद करण हे कोडच होऊन बसल आहे.

विराटने एक फलंदाज अफलातून कामगिरी केली आहे. परंतु कर्णधार म्हणून त्याला अजून चागंली कामगिरी करायची आहे. अशी आशा भारताचे माजी खेळाडू विश्वनाथ गुंडप्पांना आहे.

“कोहली एक महान फलंदाज आहे. परंतु त्याला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करायचे आहे. तो कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात विजय मिळवायला पाहिजे.”

“अनेकदा तो विजयाच्या जवळ आलेला असताना पराभूत झाला आहे. कोहलीकडून अजून जास्त अपेक्षा आहेत. तो एक ना एक दिवस ही कामगिरी करेल असा मला विश्वास आहे.” असे विश्वनाथ गुडंप्पांना वाटते. तसेच गुडंप्पांनी कोहलीच्या इंग्लंडमधील कामगिरीचेही कौतुक केले आहे.

पृथ्वी शाॅच्या कामगिरीवर गुंडप्पा समाधानी आहेत. पृथ्वीच्या आत्मविश्वासपुर्ण फलंदाजीचे त्यांनी कौतुक केले आहे. पृथ्वी परदेशात चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्यांना आहे.

अनेकांनी पृथ्वीची तुलना सचिन आणि सेहवागबरोबर केली आहे. गुंडप्पांना हे मान्य नाही त्यांच्या मते प्रत्येक क्रिकेटपटू हा इतरांपेक्षा वेगळा असतो.

महत्वाच्या बातम्या-