पहा: विराट आणि धोनीची मुलगी झिवा’चा हा खास विडिओ आपण पाहिलाय का?

भारतीय संघ सध्या काल झालेल्या टी २० सामन्यासाठी रांचीमध्ये होता. त्यावेळी विराट कोहली एम.एस.धोनीच्या घरी गेला होता. त्यावेळी तो धोनीची मुलगी झिवाला भेटला.

या भेटीचा व्हिडीओ त्याने ट्विटरवर पोस्ट केला आहे आणि लिहिले आहे की ‘मी आणि झिवा पुन्हा भेटलोय. लहान मुलांसारखा निर्मळ निष्पापपणा आजूबाजूला असणे किती आनंददायक असते.’

या व्हिडीओमध्ये विराटने झिवाला प्रश विचारला की तुमच्याकडे किती कुत्रे आहेत ६ आहेत ना तर विराट जो व्हिडीओ शूट करत होता त्याला म्हणाला “तू वेडा बनवतोय का तिला ६ नाहीत.” त्याचवेळी झिवा विराटला म्हणते “नाही दिसत काही”

त्यावेळी ती आजूबाजूला बघत असताना विराटने मांजरीचा आवाज काढला आणि झिवाला विचारले की “कोणी आवाज केला” तर परत तिनेच त्याला विचारलं “कोणी काढला”ते दोघे एवढीच वाक्य ते ४ ते ५ वेळा एकमेकांशी बोलत होते आणि मग विराट तिला म्हणाला की “झिवाने आवाज केला” तर त्यावर झिवा विराटला म्हणते “मांजरीने केला” आणि ती मांजरीचा आवाज काढायला लागली तर ते बघून विराटही तसा आवाज काढू लागला.

असा हा झिवा’बरोबरच गोड विडिओ विराटने पोस्ट करत धोनी तसेच त्याच्याही चाहत्यांना खुश केले. यापूर्वीही विराटने रांचीत सामना असताना झिवाबरोबर फोटो शेअर केले होते.

काल भारत आणि ऑस्ट्रलियाचा टी २० सामना धोनीच्या घरेलू मैदानावर झाला. ज्यात भारताला ९ विकेट्सने विजय मिळवला.