विराटने २वर्षांपूर्वीच्या स्वतःच्याच विक्रमाची केली बरोबरी

विराट कोहलीने आज श्रीलंकेविरुद्ध खणखणीत १०३ धावांची नाबाद खेळी करून दोन वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. २०१५ साली ऑगस्ट महिन्यात झालेल्या गॉल कसोटीमध्ये कोहलीने १०३ धावांची खेळी केली होती.

विशेष म्हणजे तेव्हा विराट दुसऱ्या डावात ३ धावांवर तर सध्या सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ३ धावांवरच बाद झाला आहे.

म्हणजे २०१५ च्या कसोटीमध्ये विराटने दोनही डाव मिळून १०६ धावा केल्या होत्या तर याही वेळी त्याने तेवढ्याच धावा दोन्ही डाव मिळून केल्या आहे.