मैदानात पाऊल ठेवताच किंग कोहलीच्या नावावर विराट विक्रम

नॉटिंगहॅम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात गुरुवारी (12 जुलै) पहिला वनडे सामना सुरु आहे. हा सामना विराट कोहलीचा कर्णधार म्हणून 50 वा वनडे सामना ठरला आहे.

वनडेमध्ये भारतीय संघाचे 50 सामन्यात नेतृत्व करणारा तो एकूण सातवाच कर्णधार ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 79.16 च्या सरासरीने 38 सामन्यात विजय तर 10 सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच 1 सामन्याचा निर्णय झालेला नाही.

याबरोबरच 50 व्या वनडे सामन्यात नेतृत्व करताना 38 विजय या विश्वविक्रमाची विराटने बरोबरी केली आहे. याआधी क्लाइव्ह लॉइड आणि रिकी पाँटिंगने त्यांच्या 50 व्या वनडे सामन्यात नेतृत्व करताना 38 विजय मिळवले होते.

विराटने नुकतेच 100 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचाही पराक्रम केला आहे. गुरुवारी इंग्लंड विरुद्ध भारत संघात होणारा पहिला वनडे सामना हा विराटचा कर्णधार म्हणून 102 वा सामना आहे.

भारताकडून सर्वाधिक वनडे सामन्यात नेतृत्व करणारे खेळाडू:

199 सामने – एमएस धोनी

174 सामने – मोहम्मद अझरुद्दीन

146 सामने – सौरव गांगुली

79 सामने – राहुल द्रविड

74 सामने – कपील देव

73 सामने – सचिन तेंडूलकर

50 सामने – विराट कोहली*

महत्त्वाच्या बातम्या:

-भारताकडून या खेळाडूने केले वनडे पदार्पण

-भारतीय महिला क्रिकेटर सरावाला नकोच म्हणतात, मग नक्की संघ घडवायचा तरी कसा?

-भुवनेश्वर कुमारला वनडे कारकिर्दीत मैलाचा दगड पार करण्याची संधी