कोहलीवरून डॅनियल वॅटला केलं जातंय ट्रोल

इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू डॅनियल वॅटला सध्या ट्विटरवर जोरदार ट्रोल केलं जात आहे. एका स्पेल्लिंगमधील चुकीमुळे ह्या खेळाडूला हा त्रास सहन करावा लागत आहे.

२०१४ मध्ये जेव्हा भारताने इंग्लंडचा दौरा केला तेव्हा डॅनियल वॅट आणि विराट कोहली भेटले होते. तेव्हा विराटने तिला स्वतःची बॅट गिफ्ट केली होती. सोमवारी डॅनियलने ट्विटरवर एक फोटो शेयर केला ज्यात तिने विराटकडून मिळालेल्या बॅटचा फोटो प्रसिद्ध केला आहे. या बॅटच्या खालच्या बाजूला विराटचे नाव लिहलेले दिसते.

 

परंतु यापुढे जाऊन ते नाव नीट पहिले तर लक्षात येते की विराट कोहलीचे स्पेल्लिंग Virat Kohli ऐवजी Virat Kholi असे लिहिले आहे. यावरून डॅनियलला ट्विपल (ट्विटर वापरकर्ते) कडून मोठ्या प्रमाणात लक्ष करण्यात आले.

परंतु याचा समाचार न घेईल ती डॅनियल कुठली. तिने लगेच एक ट्विटला उत्तर देताना ही माझी चूक नसून ज्या व्यक्तीने ही बॅट बनवली आहे त्याची चूक आहे असे उत्तर दिले आहे. विराट कोहलीच्या नावाची चूक ही बॅट बनवणाऱ्या व्यक्तीची असल्याचं डॅनियल पुढे म्हणते.

 

यदाकदाचित आपल्याला माहित नसेल तर…
डॅनियल वॅट ही इंग्लिश क्रिकेटर असून या २६ वर्षीय खेळाडूने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण २०१० साली भारताविरुद्ध मुंबई शहरात केले आहे. या अष्टपैलू खेळाडूने इंग्लंड कडून ५३ वनडे आणि ७० टी२० सामने खेळले आहेत. अतिशय प्रतिभावं क्रिकेटपटू असलेल्या डॅनियलने ४ एप्रिल २०१४ रोजी विराटला लग्नाची मागणी घातली होती. हे दोनही खेळाडू चांगले मित्र असून भारतीय कर्णधार विराटने तिला बॅट देखील गिफ्ट दिली आहे.