कोहलीचा ‘बॅड पॅच’ सुरूच !

 

भारताचा कर्णधार आणि कसोटी क्रिकेटमध्ये नंबर ४ वर फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीचा बॅड फॉर्म श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ही दिसून आला आहे. विराटने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ८ चेंडूत ३ धावा काढल्या आणि तो नुवान प्रदीपच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक डिकवेलाला झेल देऊन बसला. शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाऱ्याने दुसऱ्या विकेट्ससाठी २५३ धावांची भागीदारी केली होती. भारताच्या कर्णधाराला या भागीदारीचा फायदा उचलून संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती.

विराट कोहलीला २०१७ मधील कसोटी सामन्यात त्याच्या नावाला साजेशी अशी कामगिरी करता आलेली नाही. फेब्रुवारीमध्ये झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात विराटने द्विशतक लगावले होते. पण त्यानंतरच्या लगातार ६ सामन्यात त्याने संघाची निराशाच केली आहे. त्याने या ६ डावात फक्त ४९ धावा काढल्या आहे.

सध्या तरी भारताला विराटच्या खराब फॉर्ममुळे नुकसान होत नाही कारण बाकीचे फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. पण भविष्यात भारताला विराटकडून मधल्या फळीत चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.

सध्या तरी भारताला विराटच्या खराब फॉर्ममुळे नुकसान होत नाही कारण बाकीचे फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. पण भविष्यात भारताला विराटकडून मधल्या फळीत चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.सध्या तरी भारताला विराटच्या खराब फॉर्ममुळे नुकसान होत नाही कारण बाकीचे फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. पण भविष्यात भारताला विराटकडून मधल्या फळीत चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.