विराटाचे वॉकी टॉकीवर बोलणे नियमांना धरून ?

दिल्ली | न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या सामन्यात कर्णधार कोहली डगाऊटमध्ये वॉकी टॉकीवर बोलताना दिसला. मुख्य म्हणजे याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवरून करण्यात आले. 

यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा झाली की विराटाचे हे कृत्य नियमांना धरून आहे का? काही माध्यमांनाही यावर प्रश्न उपस्थित करत हे कृत्य आयसीसीच्या नियमांना धरून आहे का ? असे विचारले. 

परंतु आयसीसीच्या नियमांप्रमाणे खेळाडू ड्रेसिंग रूम किंवा डगाऊटमध्ये भ्रमणध्वनी अर्थात मोबाइल वापरू शकत नाही परंतु त्यांना वॉकी टॉकीवर बोलण्याची परवानगी दिली आहे. 

मैदानावर वॉकी टॉकी वापरायला सामानाधिकारी, खेळाडू आणि पंच यांना परवानगी असते. टी २० सामन्याततर संवादाचे माध्यम म्हणूनच वॉकी टॉकीकडे पहिले जाते. 

टी२० सामन्यावेळी खेळाडू डगाऊटमध्ये बसतात. त्यामुळे त्यांना ड्रेसिंग रूममधील कुणाशी संवाद साधायचा असेल तर वॉकी टॉकीचा वापर केला जातो. 

आयसीसीच्या नियमांप्रमाणे सुसंवाद साधण्यासाठी किंवा गोंधळ टाळण्यासाठी कमी अंतराचे माध्यम म्हणून वॉकी टॉकी वापरावे. परंतु हे करताना वॉकी टॉकीमध्ये तिसऱ्या कुणी हा संवाद ऐकायला नको.