विराट कोहलीला येताय पुरुषांकडूनच लग्नाची प्रपोजल !

0 59

चेन्नई । भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या यशाच्या शिखरावर आहे. कर्णधार आणि क्रिकेटपटू म्हणून तो पूर्णपणे यशस्वी ठरत आहे. सध्या भारतात ज्या मोजक्या लोकांची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते त्यात विराटचे नाव नक्कीच आघडीवर आहे.

विराटचे प्रेमप्रकरण अनुष्का शर्मा या बॉलीवूड अभिनेत्रींबरोबर सुरु आहे हे आता सर्वांनाच माहित आहे. विराटने कधी त्याचा इन्कारही केला नाही. अनुष्का बरोबर स्पर्धा करण्यासाठी अनेक तरुणी समोर येत आहेत. त्यात इंग्लंडची खेळाडू डॅनियल वॅट सर्वात पुढे आहे.

परंतु सध्या हा क्रिकेटपटू एका मोठ्या समस्येला सामोरे जात आहे. कर्णधार विराट कोहलीला पाकिस्तानमधून पुरुष चाहत्यांचे लग्नासाठी प्रपोजल येत आहे. विराटच्या कामगिरीवर अनेक चाहते खुश असतात. २८ वर्षीय विराट त्यांचा आदर्श देखील आहे. असे असताना त्यातील काही पुरुष चाहते विराटला थेट लग्नाची मागणी घालत आहेत.

पाकिस्तान देशात गेल्या आठवड्यात जागतिक संघ आणि पाकिस्तान संघ यात तीन टी२० सामने झाले. यात पाकिस्तानी चाहत्यांनी विराट आणि धोनीला मोठ्या प्रमाणावर ‘मिस’ केले. अगदी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. परंतु काही चाहते असेही होते ज्यांनी ‘विराट मॅरी मी’ असे बोर्ड आणले होते.

त्यातील एक पाकिस्तान देशातील पोलीस कर्मचारीही विराटला हीच मागणी करत असलेला फोटो सध्या ट्विटर आणि फेसबुकवर शेअर होत आहे.

सध्या विराट ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेत व्यस्त आहे आणि कर्णधार म्हणून त्याने ५०वा आंतरराष्ट्रीय विजय कालच चेन्नईमध्ये साजरा केला.

PC: hindustantimes & Twitter

Comments
Loading...
%d bloggers like this: