तर पुण्यात विराटकडून होऊ शकतो हा पराक्रम

0 422

पुणे । आज पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडियमवर ३०० आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला खेळाडू बनण्याचा मान कर्णधार विराट कोहलीला मिळू शकतो.

या मैदानावर भारतीय संघाने आजपर्यंत ५ सामने खेळले असून त्यातील ४ सामन्यात विराट संघाचा भाग होता. त्यात त्याने ४३.४०च्या सरासरीने २१७ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे.

या मैदानावर ३०० धावा करणारा पहिला खेळाडू बनण्यासाठी त्याला आता केवळ ८३ धावांची गरज आहे.

भारताकडून ५ पैकी ५ सामने खेळण्याचा पराक्रम केवळ आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना या मैदानावर करता आला आहे.

या मैदानावर सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
२१७ विराट कोहली
१३६ स्टिव्ह स्मिथ
१२० केदार जाधव

Comments
Loading...
%d bloggers like this: