कोहलीने सचिन, गांगुलीचा मोठा विक्रम मोडला!

विराट कोहली हा सद्य स्थितीत जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे यात कोणते ही दुमत नाही. एक कर्णधार म्हणून देखील त्याने सातत्याने चांगली कामगिरी बजावली आहे, त्या कामगिरीत आता एक तुरा अजून जोडला गेला आहे.

भारतीय कर्णधारापैकी सार्वधिक आंतरराष्ट्रीय शतके करण्याचा मान आता विराट कोहलीच्या नावे झाला आहे. सध्या सुरु असलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्या कसोटी सामन्यातल्या दुसऱ्या डावात कोहलीने शानदार शतक झळकावले आणि आपल्या १७ व्या कसोटी शतकाला गवसणी घातली.

या १७ शतकांमध्ये १० शतके कोहलीने कसोटी कर्णधार म्हणून केली आहेत. कर्णधार म्हणून १६ शतकांसाठी विराटने फक्त ७५ डाव घेतले आहे हे विशेष. अन्य भारतीय कर्णधारांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सौरव गांगुली असून त्याला ही कामगिरी करायला तब्बल २१७ डाव लागले आहेत, जे कोहलीपेक्षा १४२ ने जास्त आहे.

इतर भारतीय कर्णधार:

शतके   कर्णधार              डाव

१६       विराट कोहली       ७५
१६       सौरव गांगुली      २१७
१३       सचिन तेंडुलकर  ११३
१३       अझरुद्दीन           २३०