काय म्हणाला विराट अमीर खानच्या बॉलीवूड पदार्पणाच्या ऑफरवर

भारतीय कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड सुपरस्टार अमीर खान हे झी टीव्हीच्या एका चाट शोमध्ये भेटले होते. या शोचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. यासाठी हे दोघे मुंबईत आले होते. दिवाळीच्या निमित्ताने या शोचे आयोजन करण्यात आले होते.

या शोमध्ये अमीर खानने विराटला अभिनय क्षेत्रात काम करण्याची ऑफर दिली. तो म्हणाला “आपण विराटला जाहिरातींमध्ये काम करताना पहिले आहे. त्याचा त्यातील अभिनय हा एखाद्या कसलेल्या अभिनेत्यासारखा असतो. म्हणूनच विराटने क्रिकेटमधील कारकिर्दीतून निवृत्त झाल्यावर अभिनयाच्या क्षेत्रात यावं.”

त्यावर विराटने अगदी नम्रपणाने उत्तर दिले. तो म्हणाला की “लहान जाहिरातींमध्ये काम करण छोट काम असत. ते मी लवकर करण्याचा प्रयत्न करतो. जाहिरातीत काम करताना मला माहित असत की मला थोडाच वेळ अभिनय करायचा आहे. त्यामुळे मी ते काम लवकर करून टाकतो.अभिनयाच्या क्षेत्रात मोठे सिनेमे करावे लागतील जे मला अशक्य आहे.”

विराट आणि भारतीय संघ सध्या सुट्टीवर आहेत. दिवाळी संपली की २२ ऑक्टोबरपासून त्यांची न्यूझीलँड संघाविरुद्ध ३ वनडे सामने तर ३ टी २० सामने होणार आहेत.