हा आहे विराटचा आवडता फटका

विराटने सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या फलंदाजीमधील आवडता फटाक्याबद्दल सांगितले आहे. त्याचा आवडता शॉट हा कव्हर ड्राईव्ह नसून झोपणे आणि झोपेतून उठणे हा आहे. असे त्याने इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये हे सांगितले आहे.

विराट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नुकताच त्याने वनडेत ३० वे शतक करून पॉन्टिंगची बरोबरी केली आहे. अजून एक शतक झाले तर तो सचिन नंतर सर्वात जास्त वनडे शतक करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येईल.

सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया बरोबरच्या मालिकेमध्ये व्यस्त आहे. भारतीय संघ ३-० असा पाच सामन्यांच्या मालिकेत आघाडीवर आहे. भारतीय संघाने विराटच्या नेतृत्वाखाली सलग ९ वनडे सामन्यात विजय मिळवला आहे तसेच ३८ सामन्यांपैकी ३० सामन्यात विजय मिळवला आहे .

गुरुवारी अर्थात २८ तारखेला मालिकेतील चौथा सामना बंगलोरच्या चिन्नस्वामी मैदानावर खेळण्यात येणार आहे.