विराटला आवडतात आमिर खानचे हे ३ चित्रपट

काल भारतीय कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड स्टार आमिर खान दिवाळीसाठी शूट केलेल्या एका गप्पांच्या कार्यक्रमात हे दोघे भेटले होते. या कार्यक्रमात विराटने त्याला आवडणाऱ्या अमीर खानच्या चित्रपटाबद्दल सांगितलं.

विराट नुकतीच झालेली भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया मालिका संपवून या कार्यक्रमासाठी मुंबईला आला होता. तर आमिर खान त्याच्या सिंगापूरमध्ये चालू असलेल्या त्याच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असूनही तो या कार्यक्रमासाठी मुंबईला आला होता.

कार्यक्रमासाठी समीर अल्लाना हे शूटच्या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात अमीर खानने विराटला त्याच्या आवडते चित्रपट सांगायला सांगितले. त्यावर विराटने सांगितले की त्याला अमीरचे ‘जो जिता वही सिकंदर, ३ इडियट्स आणि पिके’ हे चित्रपट आवडतात.

अमीर विराटच्या या उत्तरावर मजेने म्हणाला अनुष्का शर्मा पिके चित्रपटाची अभिनेत्री आहे तर साहजिकच विराटला पिके चित्रपट आवडतंच असेल. विराटनेही हसून त्याला दाद दिली.

सध्या विराट चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ७ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रलिया विरुद्ध भारताची टी २० मालिका सुरु होत आहे. पहिला सामना रांचीला होणार असून यासाठी विराट लवकरच रांचीमध्ये दाखल होईल.