भाई मैं २८ का हू अभी : विराट कोहलीचा पत्रकाराला उत्तर दिलेला विडिओ व्हायरल

भारतीय टीम इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी सचिन अ बिलियन ड्रीम चित्रपटाचा खास प्रीमियर अंधेरी येथे आयोजित करण्यात आला होता. चित्रपट संपल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विराटने एका क्रीडा पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना भाई मैं २८ का हू अभी असे म्हटले.

यावेळी एमएस धोनी म्हणाला कि मला याचे वाईट वाटते कि माझ्या चित्रपटात लहानपणीचे व्हिडिओ नाहीत.

यावेळी विराट कोहलीही सचिन अ बिलियन ड्रीम चित्रपटाबद्दल बराच बोलला.
विराट म्हणाला, ” हा चित्रपट सुंदर आहे आणि देशात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होणार आहे. देशातील लोकांना नक्की आवडेल. चित्रपटात सर्व भावना आलेल्या आहेत त्यामुळे याला मोठं यश मिळेल. मी सचिनला शुभेच्छा देतो.”

यावेळी एका क्रीडा पत्रकाराच्या तुझ्या जीवनावर कधी चित्रपट येणार या प्रश्नावर विराट म्हणाला, ” भाई मैं २८ का हू अभी!'”
आणि त्यानंतर विराट तिथून निघून गेला.