असं एक खास समीकरण, जे घडल तर कोहलीची टीम इंडिया मिळवते १०० टक्के विजय

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

विराट सध्या विदेशात सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये 10 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. हे 10 विजय त्याने श्रीलंका, विंडीज, आॅस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका अशा 5 देशांमध्ये मिळवले आहेत.

नाणेफेक जिंकल्यावर कोहली कधीही पराभूत झाला नाही- 

विराट कोहलीने आजपर्यंत ४३ सामन्यात भारतीय संघाच्या कर्णधाराची धुरा वाहिली आहे. त्यात त्याने २५ विजय, ९ पराभव पाहिले आहेत तर  ९ सामने अनिर्णित राहिले आहेत.

या ४३ सामन्यापैकी २० सामन्यात विराट नाणेफेक जिंकला असून त्यात १७ विजय टीम इंडियाने मिळवले आहेत तर ३ सामने अनिर्णित राहिले आहेत. नाणेफेक जिंकल्यावर विराटने कधीही कसोटीत पराभव पाहिला नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

जे कोणत्याही आशियाई कर्णधाराला जमले नाही ते विराट कोहलीने करुन दाखवले!

अॅडलेड कसोटी जिंकत विराट कोहलीच्या टीम इंडियाने घडवला इतिहास

अॅडलेड कसोटीत यष्टीरक्षक रिषभ पंत चमकला, केले हे खास विक्रम