दिल्ली क्रिकेटच्या हितासाठी राजीनामा देत आहे – विरेंद्र सेहवाग

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने दिल्ली क्रिकेट संघटनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. संघटनेच्या हितासाठी आपण राजीनामा देत असल्याचे वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे.

सेहवाग सोबत आकाश चोप्रा आणि राहूल सांघवी या सदस्यांनीही राजीनामा दिला आहे. या तिघांनी दिल्ली रणजी संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी मनोज प्रभाकरची निवड करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

मात्र तो प्रस्ताव प्रशासनाकडून फेटाळण्यात आला होता.सेहवागच्या राजीनाम्यामागे हेच कारण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दिल्ली क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) कडून या तिघांचे राजीनामे स्विकारले जातील. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार संघटनेची नविन घटना एक ते दोन दिवसात तयार करण्यात येवून त्यावर नवीन मंडळाची नेमनुक करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून समजले आहे.

जेव्हा सेहवागला विचारले होते की प्रभाकरची नियुक्ती झाली नाही हे आपल्या राजीनाम्यागचे कारण आहे का तर सेहवागने उत्तर दिले की, “आम्ही एकत्रितपणे दिल्ली क्रिकेटमध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी एकत्र आलो आणि प्रयत्न केला. तथापी दिल्ली क्रिकेटच्या भविष्याकडे पाहून आम्ही आपणास सूचित करू इच्छितो की आम्ही तिघेजण डीडीसीएच्या क्रिकेट कमिटीची कार्यपद्धती पुढे चालू ठेवू शकणार नाहीत.”

2007-08 मध्ये जेव्हा दिल्लीने रणजी करंडक जिंकले होते आणि त्यावेळी प्रभाकर गोलंदाजीचा प्रशिक्षक होता. परंतु गंभीरला भ्रष्ट्राचारी लोकांना ड्रेसिंग रूम मध्ये नको होते.

2000 साली झालेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणात प्रभाकर याचे नाव असल्याने गंभीरचा प्रभाकरच्या नावाला विरोध असल्याचे समजते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट कोहलीची राजीव गांधी खेलरत्नसाठी शिफारस, बनणार केवळ तिसरा क्रिकेटर

एम एस धोनीने शास्त्रींच्या अनुपस्थितीत खेळाडूंना दिला कानमंत्र

मितालीच्या विक्रमांच्या यादीत आणखी एक मनाचा तुरा