17 वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये झाला होता सेहवाग नावाच्या वादळाचा प्रवेश

17 वर्षांपूर्वी 3 नोव्हेंबर 2001मध्ये भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये ‘आक्रमक’ या शब्दाला साजेसा अशा फलंदाजाचे पदार्पण झाले होते. त्याचे हे कसोटी पदार्पणही धडाकेबाज आणि आक्रमक होते. तो फलंदाज म्हणजे विरेंद्र सेहवाग

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून त्याने केली. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण करताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. तो जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा भारतीय संघाची आवस्था 68 धावांत 4 बाद अशी होती.

अशा आवस्थेतून त्याने त्याचा आदर्श असणाऱ्या सचिन तेंडुलकरबरोबर पाचव्या विकेटसाठी 220 धावांची भागीदारी केली. त्याचबरोबर त्याने पहिल्याच कसोटी सामन्यात शतकी खेळीही केली. या खेळीत त्याने 173 चेंडूत 105 धावा करताना तब्बल 19 चौकार मारले होते.

त्यावेळी दक्षिण आफ्रिकेकडे शॉन पोलॉक, नांती हेवर्ड, जॅक कॅलिस, मखाया एनटिनी, लान्स क्लुसनर आणि निकी बोजे अशा गोलंदाजांची फळी होती.

या सामन्यात भारताकडून सचिन तेंडुलकरनेही 155 धावांची दिडशतकी खेळी केली होती. मात्र भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजांना धावा करण्यात अपयश आले होते. या दुसऱ्या डावात सेहवागला 31 धावाच करता आल्या होत्या. भारताने हा सामना 9 विकेट्सने गमावला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियाच्या जेवणात बीफ नकोच… पहा कुणी केलीय ही मागणी

धोनीची जागा कोणताही खेळाडू घेऊ शकत नाही, दिग्गज खेळाडू कडाडला

बापरे! १९ वर्षीय गोलंदाजाने घेतल्या एकाच डावात १० विकेट