वीरेंद्र सेहवागने शेअर केले गांगुली, वॉर्नचे झोपलेले फोटो

आपल्या ट्विट्समुळे आणि दिलखुलास स्वभावामुळे रोज चर्चेत राहणाऱ्या सेहवागने आज भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्न यांचे क्रिकेट समालोचन करतानाच्या ब्रेक मधील काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

त्यात सेहवाग म्हणतो की भविष्याला आकार हा स्वप्नात दिला जातो आणि हे महान खेळाडू एकही मिनिट न वाया घालवता ती स्वप्न पाहत आहेत. सोने का मजा.

सध्या सुरु असलेल्या समालोचक पॅनलमध्ये वीरेंद्र सेहवाग, गांगुली हे भारतीय दिग्गज आहेत. काळ पाकिस्तान सामन्याच्या वेळी पाऊसामुळे ४-५ वेळा सामना थांबवावा लागला. त्याच काळात हे महान खेळाडू विश्रांती घेत होते.

याला तेवढ्याच खिलाडू वृत्तीने घेत शेन वॉर्नने रिप्लाय केला आहे.