तू क्रिकेट खेळणं सोडलं, आम्ही क्रिकेट पाहणं ! सेहवागला या खेळाडूकडून खास शुभेच्छा

पुणे । भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आज आपला ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. सेहवागला यामुळे त्याचे माजी संघसहकारी, मित्र, चाहते आणि माजी खेळाडूंकडून खास शुभेच्छा येत आहेत.

प्रसिद्ध बॉक्सर विजेंदर सिंगनेही सेहवागला हरयाणवी भाषेत शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणतो, ” तू जेव्हा क्रिकेट खेळणं सोडलं तेव्हा आम्ही क्रिकेट पाहणं सोडलं. तो एक काळ होता जेव्हा आम्ही ट्रॅक्टरची बॅटरी पकडून तुझी फलदांजी पाहत असे. ”

विजेंदर सिंगसह अजिंक्य रहाणे, अतुल कसबेकर, पार्थिव पटेल वगैरे दिग्गजांनी सेहवागला शुभेच्छा दिल्या आहेत.