वीरेंद्र सेहवाग ट्विटरवर करोडपती

एकावेळी आपल्या फटकेबाजीने क्रिकेटचात्यांची मने जिंकणारा वीरेंद्र सेहवाग निवृत्तीनंतरही मोठ्या प्रमाणावर ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांच मनोरंजन करत असतो. आता हा स्फोटक फलंदाज फॉलोवर्समध्येही मागे राहिलेला नाही. वीरेंद्र सेहवागचे सध्या ट्विटरवर फॉलोवर्स आहेत १,००,०७,६१५.

१ कोटी फॉलोवर्स असणारा वीरेंद्र सेहवागला फक्त तिसरा भारतीय क्रिकेटपटू असून त्याच्या पुढे क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. सध्या सचिनचे १,६१,४३,१३९ फॉलोवर्स असून त्याखालोखाल विराट कोहलीचे १,५४,६७,७६० एवढे आहेत.

सध्या जगात सर्वात जास्त फॉलोवर्स असणाऱ्या १०० लोकांमध्ये नरेंद्र मोदी (३० मिलियन ), अमिताभ बच्चन (२६ मिलियन ), शाहरुख खान (२५ मिलियन ), आमिर खान (२० मिलियन ), पीएमओ इंडिया (१८ मिलियन ), अक्षय कुमार (१७ मिलियन ), प्रियांका चोप्रा ( १७ मिलियन ), ह्रितिक रोशन ( १७ मिलियन ), सचिन तेंडुलकर (१६ मिलियन ) हे भारतीय दिग्गज आहेत.

सचिन तेंडुलकर हा एकमेव क्रिकेटपटू आहे जो जगातील टॉप १०० फॉलोवर्स असणाऱ्या लोकांच्या यादीत आहे. सचिन या क्रमवारीत ९९व्या, विराट कोहली १०८व्या तर वीरेंद्र सेहवाग २२९व्या क्रमांकावर आहे.

याबद्दल वीरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ” मला ट्विटरवर करोडपती बनविल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. सर्व चाहत्यांना १ कोटी वेळा धन्यवाद”

टॉप ५ फॉलोवर्स असलेले क्रिकेटर्स
१६ मिलियन सचिन तेंडुलकर
१५ मिलियन विराट कोहली
१० मिलियन वीरेंद्र सेहवाग
८.३९ मिलियन सुरेश रैना
६.२९ मिलियन एम एस धोनी