धोनीबद्दल वीरेंद्र सेहवागने केले मोठे वक्तव्य

भारताचा दोन वेळचा विश्वविजेता कर्णधार एमएस धोनीच्या समर्थनार्थ माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग वक्तव्य करताना योग्य वेळ आल्यावर धोनी संघातील जागा अडवणार नाही असे म्हटले आहे.

“धोनीने त्याची संघातील भूमिका नक्की समजून घेतली पाहिजे. त्याने पहिल्यापासून फटकेबाजी करायला हवी होती. ” सेहवाग म्हणाला.

सेहवाग पुढे म्हणाला, “संघाला सध्याही धोनीची गरज आहे. टी२० संघातही तो खेळला पाहिजे. तो योग्यवेळी निवृत्ती घेईल यात शंका नाही. तो युवा खेळाडूंचा रस्ता अडवणार नाही. “

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला पाठिंबा देताना लोक खेळाडू एकदा ३०वयाच्या पुढे गेला की प्रत्येक गोष्टीत चुका काढतात असे म्हटले होते. 

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक टी२० सामना आज तिरुवनंतपुरममध्ये होणार आहे.