जेव्हा ज्वाला गुट्टा सेहवागला सांगते रेकॉर्डमधील चूक

आपल्या बेधडक वागण्यामुळे ज्वाला गुट्टा ही कायमच चर्चेचा विषय असते. कोणत्याही खेळाडूवर अन्याय झाला तर ज्वाला प्रतिक्रिया द्यायला अजिबात मागे पुढे पाहत नाही. तर गेल्या एक वर्षांपासून ट्विटर आणि ट्विट्स यामुळे भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागही जोरदार चर्चेत असतो.

परंतु बऱ्याच वेळा काहीतरी वेगळंच अथवा चुकीचं पोस्ट केल्यामुळे सेहवाग ट्विटरवर ट्रोल झालेला आहे. परवासुद्धा भारत- पाकिस्तान सामना सुरु असताना सेहवागने इंडोनेशिया ओपन जिंकलेल्या किदाम्बी श्रीकांथला शुभेच्छा देताना चुकीचा ट्विट केला. इंडोनेशिया ओपन जिंकलेला पहिला खेळाडू किदाम्बी श्रीकांथ आहे असा तो ट्विट होता.


यावर सेहवागला हे ट्विट चुकीचे असल्याचे ज्वाला गुट्टाने ट्विटरच्याच माध्यमातून सांगितले. किदाम्बी श्रीकांथ नाही तर साईना नेहवाल पहिली भारतीय आहे जिने इंडोनेशिया ओपन पहिल्यांदा जिंकली तर किदाम्बी श्रीकांथ हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे ज्याने ही स्पर्धा जिंकली अशी ज्वाला तिच्या ट्विटमध्ये म्हणाली .