गेलची घोर निराशा, सेहवाग खेळू देणार नाही?

बेंगलोर । काल आयपीएल लिलावाच्या इतिहासात ख्रिस गेल या खेळाडूला तब्बल दोन वेळा कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. यापाठीमागे नक्की काय कारण आहे हे पुढे आहे नाही.

ख्रिस गेल हा ट्वेंटी२० प्रकारातील जगातील सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू आहे. या प्रकारात १० हजार पेक्षा जास्त धावा करणारा तो एकमेव खेळाडू असून त्याने ३२३ सामन्यात ४०.६९च्या सरासरीने ११०६८ धावा केल्या आहेत. असे असतानाही गेले दोन दिवस त्याला खरेदी करण्यात कुणीही रस दाखवला नाही.

अखेर त्याला त्याच्या बेस प्राईझ अर्थात आधारभूत किंमतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने खरेदी केले.

याबद्दल बोलताना पंजाबचा मेंटॉर आणि माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने गेलच महत्व सांगताना त्याच्या ब्रँड व्हॅल्यूचे कौतुक केले.

“गेलचे संघात असणे ही मोठी गोष्ट आहे. एक सलामीवीर म्हणून गेल समोरच्या संघाला नक्कीच धोकादायक ठरू शकतो. ” असे सेहवाग म्हणाला.

तर गेलला नाही मिळणार संधी…
ख्रिस गेलला या आयपीएल २०१८मध्ये किती संधी मिळेल याबद्दल शंकाच आहे. वीरेंद्र सेहवागने याबद्दल एकप्रकारे वेगळेच संकेत दिले आहे. ” गेलची ब्रँड व्हॅल्यू मोठी आहे. त्यामुळे तो या प्रकारातील किती मोठा खेळाडू आहे हे समजते. परंतु आम्ही गेलला संघात एक बॅकअप (पर्यायी) सलामीवीर म्हणून घेतले आहे. ” असे सेहवाग म्हणाला.

किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये केएल राहुल आणि ऍरॉन फिंचसारखे हे नियमित सलामीवीर असणार आहेत. त्यामुळे ते ३८ वर्षीय गेलवर किती विश्वास ठेवणार हाही मोठा प्रश्नच आहे. त्यामुळे सेहवागने जे भाष्य केले आहे त्यावरून त्यात तथ्य असल्याचे दिसते.