म्हणून भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत वाद झाले नाहीत

रांची । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने ऑस्ट्रेलिया संघ भारतीय संघाबरोबर स्लेज का करत नाही याच कारण सांगितलं आहे. सेहवाग म्हणतो ऑस्ट्रेलियन खेळाडू पुढच्या होणाऱ्या आयपीएल लिलावामुळे घाबरले आहेत.

सेहवागच्या म्हणण्यानुसार ऑस्ट्रेलियन खेळाडू हे आयपीएलकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहत आहेत.

“पुढच्या वर्षी आयपीएलचा मोठा लिलाव आहे. जर त्यांनी भारतीय खेळाडूंशी वाद घातले तर संघमालक ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पैसे खर्च करायला विचार करतील. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे मोठे नुकसान होऊ शकते. म्हणूनच ते भारतीय खेळाडूंशी वाद घालताना दिसत नाही. “ असे सेहवाग इंडिया टीव्हीशी बोलताना म्हणाला.

ऑस्ट्रेलियन संघ वॉर्नर आणि स्मिथ यांच्यावर खूप अवलंबून आहे त्यामुळे ते सध्या दबावात आहेत असेही सेहवागला वाटते.

” ऑस्ट्रेलियन संघ हा मोठ्या दबावात आहे. कारण त्यांच्याकडे मोठे खेळाडू नाहीत. त्यांचा संघ वॉर्नर आणि स्मिथवर अवलंबून आहे. “ असे सेहवाग पुढे म्हणतो.