आपण कधी विचारही केला नव्हता की दुसरा सचिन होईल -वीरेंद्र सेहवाग

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या मते विराट कोहली मास्टर ब्लास्टरचे विक्रम मोडू शकतो. विरारमध्ये अजून १० वर्षांचं क्रिकेट बाकी असल्याचं मतही ह्या दिग्गजाने मांडले आहे.

सेहवाग म्हणतो, ” आपण कधी विचारही केला नव्हता की दुसरा सचिन होईल. परंतु विराटने हे सगळं बदललं. मला वाटत विराट सचिनचे विक्रम मोडेल. ”

इंडिया टीव्ही बरोबर बोलताना वीरू पुढे म्हणाला, ” विराट सध्या केवळ २८ वर्षांचा आहे आणि अजून त्याच्यामध्ये कमीतकमी १० वर्षांचं क्रिकेट बाकी आहे. तो काहीतरी मोठेच रेकॉर्ड बनवले आणि सचिनचे विक्रम मोडेल. ”

वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला की त्याला त्याचे नाव बदलून सचिन तेंडुलकर करायला आवडेल.

” मला माझे नाव बदलून सचिन तेंडुलकर करायला आवडेल. त्या नावावर अनेक विक्रम आहेत. मी त्याच्या आसपाससुद्धा नाही. सचिनला देव म्हटले जाते. आणि कुणाला देव म्हटलेले नाही आवडणार? ” सेहवाग पुढे म्हणतो.