वीरेंद्र सेहवागने दिल्या बॉलीवूडच्या बादशहाला हटके शुभेच्छा !

आज बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा ५२ वा वाढदिवस आहे. या निमित्त भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने त्याच्या हटके शैलीत ट्विटरवरून शाहरुखला शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याने ट्विटरवर शाहरुख बरोबरचा एक फोटो पोस्ट करून लिहिले आहे ” वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रावण आज बावन्न वर्षांचा झाला. मन जिंकणे हा तुझा आज पण छंद आहे.”

वीरेंद्र सेहवाग सध्या सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह असतो आणि त्याच्या चाहत्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट करून आनंद देत असतो. तो नेहमी अनेक खेळाडू तसेच अभिनेते आणि अन्य सेलेब्रिटीजना त्याच्या वेगळ्या शैलीत शुभेच्छा देतो तसेच त्यांची खिल्लीही उडवतो.

त्यामुळे सेहवाग आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला असला तरी सातत्याने प्रकाशझोतात कसे राहायचे हे त्याला चांगले ठाऊक आहे.