सेहवागने काल क्रिकेटचा सार असा सांगितला !

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियामध्ये आपले नाव सर्वोच्च ठिकाणी नेवून ठेवले आहे. सेहवागने केलेला कोणताही ट्विट हा चर्चेचा विषय होतो.

काल सुद्धा या खेळाडूने असाच काही ट्विट केला ज्यात त्याने आपली संपूर्ण क्रिकेट कारकीर्द जेमतेम १४० शब्दात सांगितली.

” आपण नेहमी बोलणारे शब्द हेच कायम परिणाम करतात असे नाही तर आपण ते कसे बोलतो यावर बरंच काही अवलंबून असते. तसेच क्रिकेटमध्येही खराब चेंडूचा काहीही परिमाण होत नाही आपण त्याला कसे टोलावतो ते महत्वाचे असते. “

 

वीरेंद्र सेहवागने कारकिर्दीत कसोटी आणि वनडे अशा दोंन्ही प्रकारात तुफानी फटकेबाजी करत धावा केल्या आहेत.