Video: एबी डिव्हिलिअर्ससारख्या शुभेच्छा विराट-अनुष्काला कुणीच दिल्या नसतील

विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघातील संघ सहकारी ए बी डिव्हिलियर्सने विराट आणि अनुष्का शर्माला त्यांच्या लग्नाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. विराट आणि अनुष्काचा ११ डिसेंबरला इटलीत कुटुंबीय आणि जवळचे मित्रपरिवारांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला.

याबद्दल विराट आणि अनुष्कावर विविध स्थरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांना चित्रपटसृष्टीतील सेलेब्रेटी आणि अनेक क्रिकेटपटुंनीही शुभेच्छा दिल्या आहेत. डिव्हिलियर्सने विराट अनुष्काला शुभेच्छा देताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

यात त्याने विराट आणि अनुष्काला खास संदेश दिला आहे. तसेच विराटने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिल्याचे म्हटले आहे. डिव्हिलियर्सने विराट आणि अनुष्काला संदेश दिला आहे की ” तुमचे आयुष्य आनंदी असेल आणि तुम्हाला खूप मुले व्हावीत.”

विराट आणि अनुष्काने आजच त्यांना मिळालेल्या शुभेच्यांसाठी सर्वांचे ट्विटरवरून आभार मानले आहेत. या दोघांनी आपल्या लग्नाची बातमीही सोशल मेडियावरूनच सर्वांना दिली होती.

ही सेलेब्रेटी जोडी सध्या रोममध्ये हनिमूनला गेले आहेत. ते २१ डिसेंबरला दिल्लीत तर २६ डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन देणार आहेत.