लक्ष्यच्या अध्यक्षपदी विशाल चोरडिया तर सचिवपदी सुंदर अय्यर यांची फेरनिवड 

पुणे: प्रख्यात उद्योगपती व खादी बोर्डचे प्रमुख विशाल चोरडिया यांची क्रीडा स्वयंसेवी संस्था लक्ष्यच्या अध्यक्षपदी तर एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांची सचिवपदी फेरनिवड करण्यात आली. 2018 ते 2020 या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे.

लक्ष्यच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 11 कार्यकारी समिती सदस्यांचीही 2018 ते 2020 या कालावधीसाठी निवड करण्यात आली. स्वस्तिक सिरसीकर आणि आशिष देसाई यांची उपाध्यक्षपदी तर डॉ. अमय येरवडेकर यांची सहसचिवपदी व भरत शहा  यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय इतर निवड झालेल्या सभासदांमध्ये  नरेंद्र फिरोदीया, ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे, मनिष मेहता, रितू नथानी व सत्येन पटेल यांचा समावेश आहे.

खेळाडूंची गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे व त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी 9 वर्षापुर्वी लक्ष्य संस्थेची स्थापना करण्यात आली. याव्दारे खेळाडूंना आपले ध्येय साध्य करण्यासाठी मदत मिळावी असा हेतू आहे.

सध्या  विविध क्रीडा प्रकारातील 20मुली व 17मुले अशा एकुण 37 खेळाडूंना लक्षचा पाठिंबा असून यांतील लक्ष्यच्या 6 खेळाडूंनी  ऑलंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, कनिष्ठ व वरिष्ठ गटातील  25 पेक्षा जास्त खेळाडूंनी आशियायी क्रीडा स्पर्धा व कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

सध्या लक्ष्यने विविध वयोगटातील 30 हुन अधिक राष्ट्रीय खेळाडूंना पाठिंबा दिला आहे. आम्ही 2020 ऑलंपिकचे लक्ष निश्चित केले असून किमान 10खेळाडू आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करतील आणि खऱ्या अर्थाने पदक संधी मिळवतील. पण आमचे खरे ध्येय हे 2024 असून यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले असल्याचे लक्ष्यचे अध्यक्ष विशाल चोरडीया यांनी सांगितले.

2018-2020 वर्षासाठी नवीन व्यवस्थापकीय समिती खालीलप्रमाणे-
आजीव अध्यक्ष-  मनिष जैन
अध्यक्ष- विशाल चोरडिया
उपाध्यक्ष- स्वस्तिक सिरसीकर, आशिष देसाई
सचिव – सुंदर अय्यर
सहसचिव-डॉ. अमेय येरवडेकर
खजिनदार- भरत शहा
कार्यकारिणी सभासद-  नरेंद्र फिरोदीया, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, मनिष मेहता, रितू नथानी
सत्येन पटेल