लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे

भारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने आपली गेल्या २५ वर्षातील ड्रीम ११ टीम इंडियाची निवड केली आहे.

लक्ष्मणने ही ड्रीम टीम गेल्या २५वर्षातील कामगिरीच्या आधारे तयार केली आहे. याच काळात काही दिग्गज खेळाडूंबरोबर खेळल्यामुळे त्याने एका जबरदस्त संघाची निवड केली आहे.

यावेळी त्याने कसोटी संघाचे सलामीवीर म्हणुन एकवेळचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि मुरली विजयला संधी दिली आहे.

तिसऱ्या स्थानावर अपेक्षेप्रमाणे राहुल द्रविडला संधी देत चौथ्या स्थानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर तर पाचव्या स्थानावर विराट कोहलीला स्थान दिले आहे. स्वत: व्हीव्हीएस ज्या जागी खेळत होता त्या जागी सध्याचा कर्णधार कोहलीला त्याने संधी दिली आहे.

या संघाचे कर्णधारपद सौरव गांगुलीकडे देताना त्याला संघात ६वे तर यष्टीरक्षक म्हणुन एमएस धोनीची निवड केली आहे.

त्याच्या गोलंदाजीच्या ताफ्यात अनिल कुंबळे हा एकमेव फिरकीपटू असुन जवागल श्रीनाथ, झहीर खान आणि भुवनेश्वर कुमार वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.

व्हीव्हीएस लक्ष्मणची ड्रीम ११ कसोटी टीम- 

विरेंद्र सेहवाग, मुरली विजय, राहुल द्रविड, सचिन तेंडूलकर, विराट कोहली, सौरव गांगुली (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), अनिल कुंबळे, भुवनेश्वर कुमार, जवागल श्रीनाथ, झहीर खान

महत्त्वाच्या बातम्या-

-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड

– एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक

– भारतीय संघासाठी ही आहे दिवसातील सर्वात मोठी गोड बातमी