जेव्हा व्हीव्हीएस लक्ष्मण करतो रसेल अरनॉल्डला ट्रोल !

भारतीय संघातील भरवशाचा माजी फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मणने आज ट्विटरवरून श्रीलंकेच्या माजी खेळाडू रसेल अरनॉल्डला त्याने केलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेच्या भविष्यवाणीच्या ट्रोल केले आहे.

भारतीय संघाने नुकतीच पार पडलेलेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेविरुद्ध १-० असा विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिला आणि तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंका संघाला यश मिळाले होते. तर दुसरा सामना भारतीय संघाने मोठ्या फरकाने जिंकला होता.

याच धर्तीवर रसेल अरनॉल्डने श्रीलंकन संघाने केलेल्या चांगल्या खेळावर खुश होऊन ट्विट केले होते की ” तर आता कसोटी मालिका १-० अशी संपली आहे आणि मी तुम्हाला सांगतो वनडे मालिकाही काही महिन्यांपूर्वी जशी ५-० अशी संपली होती तशी यावेळी संपणार नाही.”

या अर्नोर्ल्डच्या ट्विटला उत्तर देताना लक्ष्मणने त्याला ही वनडे मालिका ३ सामन्यांची होणार आहे याची आठवण करून देत त्याच्या ट्विटला ट्रोल केले आहे.

लक्ष्मण अरनॉल्डला म्हणाला, “नक्कीच रसेल, ३ सामन्यांच्या मालिकेत हे नक्कीच होणार नाही. तुझी ही भविष्यवाणी अयशस्वी होणार नाही.”

लक्ष्मण आणि अरनॉल्ड हे दोघेही सध्या समालोचन करतात. नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेदरम्यानही हे दोघे एकत्र समालोचन करताना दिसले होते.