भारतीय महिला संघावरील त्या ‘ट्विट’मुळे ऋषी कपूरवर ट्विटरकरांचा हल्लाबोल

महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ यजमान इंग्लंड संघाकडून ९ धावांनी पराभूत झाला. सामना सुरु होण्यापूर्वी काही काळ बॉलीवूडमधील जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी भारतीय संघाला शुभेच्छा.

परंतु या ट्विट’मुळे मोठा वाद निर्माण झाला तसेच ऋषी कपूर यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ऋषी कपूर यांनी काल शुभेच्छा देताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचे एक छायाचित्र प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी असे लिहिले आहे की, आज भारतीय महिला संघाकडून गांगुलीने केलेली कृती पुन्हा केली जाईल अशी मला अपेक्षा आहे. भारतीय संघाने २००२ साली नेटवेस्ट सिरीजमध्ये अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यांनतर सौरवने केलेली कृती आठवतेय.

त्यांनतर उद्भवलेल्या वादानंतर मी काहीच चुकीचं बोललो नाही असं स्पष्टीकरण दिल आहे.