एक वेळ विराट बरोबर सेल्फी काढण्याचे होते स्वप्न आता खेळणार विराटच्याच संघात…

मंगळवारी (18 डिसेंबर) जयपूरमध्ये आयपीएलच्या 12 व्या मोसमाचा लिलाव पार पडला. या लिलावात अनेक संघानी युवा खेळाडूंना पंसती दिली आहे. या लिलावात एकूण 60 खेळाडूंवर बोली लागली. त्यात 40 भारतीय आणि 20 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूने (आरसीबी) सात खेळाडूंना विकत घेतले. यामध्ये शिमरन हेटमेयर(4.2 कोटी), देवदुत पड्डीकल(20 लाख), शिवम दुबे(5 कोटी), हेन्रीक क्लासेन(50 लाख), गुरकीरत मान सिंग(50 लाख), हिंमत सिंग(65 लाख), प्रयास राय बर्मन(1.5 कोटी) यांचा समावेश आहे.

आरसीबीमधील 16 वर्षीय प्रयास राय बर्मन हा आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे.

“विराट सोबत एक सेल्फी काढण्यासाठी वाट बघावी लागत असताना आता तू त्याच्यासोबत आयपीएलमध्ये खेळणार आहे याबद्दल कसे वाटत आहे ?”, असे एका रिपोर्टरने प्रयासला विचारले असता त्याने “मी विराट सोबत सेल्फी काढण्याचे स्वप्न बघत होतो. मी कधीच विचार केला नव्हता की मला त्याच्याबरोबर खेळायला मिळेल”, असे उत्तर दिले.

“भारतातील बाकीच्या युवा क्रिकटपटू प्रमाणेच माझाही आदर्श विराट कोहली आहे. आयपीएल मी पहिल्या हंगामापासून बघत आलो आहे”, असेही प्रयास म्हणाला.

बंगालच्या या लेगस्पिनर प्रयासने यावर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये पदार्पण करताना 9 सामन्यात 4.45च्या इकॉनॉमी रेटने 11 विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलच्या लिलावात आरसीबी बरोबरच राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेवन पंजाब यांनीही प्रयासवर बोली लावली होती.

तसेच जयदेव उनाडकट मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यासह तमिळनाडूचा वरुण चक्रवर्थीही यावर्षी सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. या दोघांनाही प्रत्येकी 8 कोटी 40 लाखांची बोली लागली आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करन सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे.

मात्र यावर्षीच्या आयपीएलमध्ये ब्रेंडन मॅक्यूलम, कोरे अँडरसन, डेल स्टेन अशा अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना कोणत्याच संघाने पसंती दाखवलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

असे असतील २०१९ च्या आयपीएलसाठी सर्व संघ…

मुंबईसाठी युवराज सिंगवरची बोली ठरली सर्वात मौल्यवान!

करोडपती जयदेव उनाडकतने नक्की जादू-टोना केला असणार