भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या प्रशिक्षकाची आत्महत्या करण्याची होती इच्छा

इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या सुरु असलेल्या 2019 क्रिकेट विश्वचषकात रविवारी, 16 जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना पार पडला. या सामन्यात भारताने 89 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानला या पराभवानंतर मोठ्या प्रमाणात टिकेला सामोरे जावे लागले.

तसेच या पराभवानंतर आत्महत्येचा विचार मनात आला असल्याचे पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यानंतर 23 जूनला दक्षिण आफ्रिकेला 49 धावांनी पराभूत करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे.

दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना आर्थर म्हणाले, ‘मागच्या रविवारी(16 जून) माझी आत्महत्या करण्याची इच्छा होती. पण हे फक्त एक प्रदर्शन(कामगिरी) होते.’

‘हे इतके पटकन झाले. तूम्ही एक सामना पराभूत होता. परत एक सामना पराभूत होता. हा एक विश्वचषक आहे. इथे मीडियाचा दबाव, लोकांच्या आपेक्षा आणि त्यात तूमची कामगिरी. आम्ही सर्व तिथे उभे होतो.’

‘आम्ही आमच्या खेळाडूंना सतत सांगत असतो. एक चांगली कामगिरी आपल्याला आज प्रोत्साहन देणार आहे.’

भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 336 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तानला डकवर्थ लूईस नियमानुसार 40 षटकात 302 धावांचे आव्हान देण्यात आले. पण पाकिस्तानला 40 षटकात 6 बाद 212 धावाच करता आल्या.

या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदवरही मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. पण त्यानंतर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत या विश्वचषकातील दुसरा विजय मिळवला. पाकिस्तानने आत्तापर्यंत 6 सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 3 सामन्यात पराभव स्विकारला आहे आणि 1 सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

त्यामुळे ते सध्या 5 गुणांसह गुणतालिकेत 7 व्या क्रमांकावर आहेत. त्यांना या विश्वचषकातील उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी साखळी फेरीतील उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळविणे आवश्यक आहे.

त्यांचा पुढील सामना उद्या(26 जून) न्यूझीलंड विरुद्ध होणार असून आर्थर यांनी न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

वेस्ट इंडिजचे महान फलंदाज ब्रायन लारा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल

११३३ खेळाडूंपैकी असा मोठा विश्वविक्रम करणारा शाकिब अल हसन पहिलाच!

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी अर्जून तेंडुलकर करतोय इंग्लंडला अशी मदत