गौतम गंभीरच टेन्शन वाढलं, दिल्ली न्यायालयाने बजावले समन्स

काही दिवसांपूर्वीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या गौतम गंभीर समोरील अडचणीत वाढ झाली आहे. त्याला दिल्ली न्यायालयाने एका रियल इस्टेट प्रोजेक्टमधील गैरव्यवहाराप्रकरणी फ्लॅट खरेदीदारांनी केलेल्या तक्रारीनंतर समंन्स बजावले होते. पण समन्स बजावल्यानंतरही तो न्यायालयात उपस्थित न राहिल्याने त्याच्याविरुद्ध जमानती वॉरंट जारी करण्यात आले आहे.

या तक्रारीनुसार 17 फ्लॅट खरेदीदारांनी आरोप केला आहे की 2011 मध्ये त्यांनी गजियाबाद येथील इंदिरापूरम परिसरात एका प्रोजेक्टमध्ये फ्लॅटच्या बुकींगसाठी 1.98 कोटी रुपये दिले आहेत. पण हा प्रोजेक्ट सुरु झालेला नाही. तसेच हा प्रोजेक्ट रूद्र बिल्डवेल रिएलिटी प्रायवेट लिमिटेड आणि एच आर इंफ्रासिटी प्रायवेट लिमिटेड यांचा होता.

गंभीर हा रूद्र बिल्डवेल रिएलिटी प्रायवेट लिमिटेड आणि एच आर इंफ्रासिटी प्रायवेट लिमिटेड यांच्या या संयुक्तरित्या असणाऱ्या प्रोजेक्टचा ब्रँडअँबेसिडर होता.

हा आरोप फ्लॅट खरेदीदारांनी 2016 मध्ये केला आहे. त्यामुळे गंभीरला या प्रकरणी सातत्याने न्यायालयात उपस्थित न राहिल्याने 10 हजार रुपयांचे जमानती वॉरंट जारी करण्यात आले आहे.

गंभीरने या प्रकरणाची ट्विटरवरुन संपूर्ण माहिती देताना म्हटले आहे की, ‘माझ्या विरुद्ध जमानती वॉरंट जारी झाल्याचे वृत्त मीडियामध्ये फिरत आहे. मला याबद्दल स्पष्ट करायचे आहे की न्यायालयात उपस्थित राहण्याच्या तारखा माझ्या रणजी सामन्याच्या वेळात किंवा काही व्यावसायिक कामाच्या वेळात येत होत्या.’

‘माझ्यावतीने माझे वकिल नेहमी न्यायालयात हजर राहत होते. मी न्यायालयाच्या नियमांचे पालन करत आहे. तसेच मला स्पष्ट करायचे आहे की मी कधीही त्यांचा ब्रँडअँबेसिडर नव्हतो.’

‘तसेच आरोप हे कंपनी आणि त्याचे प्रमोटर्स मुकेश खुराणा आणि त्यांची पत्नी बबिता खुराणा यांच्या विरोधात आहेत. त्यांनी फ्लॅट खरेदीदारांकडून पैसे घेतले आहेत.’

‘तसेच खरेदीदारांना त्यांचे फ्लॅट पुरवण्यासाठीच्या कोणत्याही प्रक्रियेत माझे नियंत्रण नव्हते. ज्या खरेदीदारांनी त्यांचे पैसे गुंतवले आहेत त्यांना माझी सहानुभुती आहे. मी एक जबाबदार नागरिक म्हणून शक्य असलेली सर्व मदत त्यांना करेल.’

या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणीची पुढील तारिख 24 जानेवारी आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या या मोठ्या खेळाडूला संघातून डच्चू

एशिया कपसाठी कर्णधार सुनिल छेत्रीची टीम इंडिया तयार

एकवेळ टीम इंडियाला धू-धू धूणारा फलंदाज घेतोय सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास