…तर युवराजला खेळता आला असता निवृत्तीचा सामना

सोमवारी(10 जून) भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने त्याच्या निवृत्तीची घोषणा करताना अनेक विषयांवर खूलासे केले आहेत.

यावेळी तो जर यो-यो टेस्ट उत्तीर्ण झाला नाही तर त्याला त्याच्या निवृत्तीचा सामना(फेअरवेल मॅच) खेळायला मिळेल, अशी ऑफर आली असल्याचाही त्याने खूलासा केला आहे.

युवराज म्हणाला, ‘मला सांगण्यात आले होते. की जर मी यो-यो टेस्ट उत्तीर्ण झालो नाही तर मी निवृत्तीचा सामना खेळू शकतो.’

‘मी बीसीसीआयमधील कोणालाही सांगितले नाही की मला शेवटचा सामना खेळायचा आहे. जर मी चांगला होतो, माझ्यात क्षमता होती, तर मी मैदानातून निवृत्ती घेतली असती. मी मला एक सामना हवा आहे, असे म्हटले नाही. मला अशा प्रकारचे क्रिकेट खेळणे पसंत नाही.’

‘मी त्यावेळी म्हटलो, मला निवृत्तीचा सामना नको. जर यो-यो टेस्ट उत्तीर्ण नाही झालो तर मी चूपचाप घरी निघून जाईल. त्यानंतर मी यो-यो टेस्ट उत्तीर्ण झालो आणि नंतर माझ्या हातात काही नव्हते.’

युवराजने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जून 2017 मध्ये खेळला आहे. त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही.

त्याचबरोबर भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंना यो-यो टेस्ट उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. युवराजनेही त्याची यो-यो टेस्ट पास केली होती. परंतू त्याच्या फिटनेस आणि फॉर्ममुळे त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

युवराजने सांगितले, गांगुली की धोनी, कोण आहे सर्वोत्तम कर्णधार

‘युवराज’ म्हणजे…

युवराज पाठोपाठ हे पाच खेळाडूही घेऊ शकतात निवृत्ती