१८ वर्षाच्या खेळाडूला लाजवेल अशी वसिम जाफरची चाळिशीत कामगिरी

मुंबईकर वसिम जाफरने सलग दुसऱ्या हंगामात विदर्भाकडून खेळताना आपला जबरदस्त फाॅर्म सुरु ठेवला आहे. पहिल्या दोन सामन्यात २७, ६३, ४१ आणि ३४ धावांची खेळी केल्यावर या महान फलंदाजाने आजही दीडशतकी खेळी केली.

त्याने विदर्भ विरुद्ध बडोदा सामन्यात त्याने १८४ चेंडूत १५३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १४ चौकार मारले. त्याला विष्णु सोलंकीने धावबाद केले.

या खेळीत तो जेव्हा ९७ धावांवर पोहचला तेव्हा त्याने रणजी ट्राॅफीतील ११ हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

तसेच या स्पर्धेत सर्वाधिक वेळा त्रिशतकी भागिदारी करण्याच्या विजय हजारेंच्या विक्रमाची त्याने आज बरोबरी केली.

विजय हजारेंनी रणजी ट्राॅफी स्पर्धेत ४ वेळा त्रिशतकी भागिदारी केली होती. तर आजच्या त्रिशतकी भागिदारीमुळे जाफरने याच विक्रमाची बरोबरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा- 

आजच्या सामन्यात होणाऱ्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही

विराट- रोहितला आज रैनाचा विक्रम मोडण्याची संधी

आज हिटमॅन रोहित करणार टी२०मधील सर्वात हिट कारनामा

टीम इंडियाला टी२०चा इतिहास नव्याने लिहिण्याची आज संधी