Video: अक्षर पटेलला विकेट घेण्यात चक्क हेल्मेटने केली मदत!

भारताचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल सध्या इंग्लंडमध्ये डरहॅम संघाकडून काउंटी क्रिकेट खेळत आहे. तसेच यात त्याने दमदार कामगिरी देखील केली आहे.

पण वॉरविकशायर विरुद्धच्या सामन्यात त्याच्याबाबत एक गमतीशीर गोष्ट घडली. या सामन्यातील तिसऱ्या डावात गोलंदाजी करत असताना त्याने रायन साइडबॉटमला विचित्र पद्धतीने बाद केले.

झाले असे की पटेलने टाकलेला चेंडूवर रायनने स्केअर लेगच्या दिशेने फ्लीक शॉट मारला. परंतू तो चेंडू शॉर्टलेगला उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटला लागला आणि गोलंदाज पटेलच्या दिशेने आला. त्यामुळे लगेचच पटेलने झेल घेत रायनला झेलबाद केले.

पटेलने या सामन्यात 9 विकेट्स आणि 22 धावा केल्या आहेत. तसेच याआधीही त्याने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्याने ग्लॅमॉर्गन विरुद्धच्या त्याच्या पहिल्याच सामन्यात नाबाद 95 धावा आणि 3 विकेट्स घेतल्या होत्या.

तर त्यानंतर नॉर्थंट्स विरुद्धच्या सामन्यात त्याने 3 विकेट आणि 10 धावा केल्या होत्या. यानंतर तो त्याचा तिसरा सामना वॉरविकशायर विरुद्ध खेळत आहे.

अक्षर हा भारताकडून आत्तापर्यंत 38 वनडे आणि 11 टी20 सामने खेळला असून यात त्याने अनुक्रमे 45 आणि 9 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याचा तीन वेळा भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. परंतू त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.

तसेच त्याची 15 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या एशिया कपसाठी 16 जणांच्या भारतीय निवड करण्यात आली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

युएस ओपन: नदालची दुखापतीमुळे माघार, डेल पोट्रोचा अंतिम फेरीत प्रवेश

कूक आणि टीम इंडियाचे नाते खास…शेवटच्या सामन्यातही मोठा पराक्रम