Video: धोनीची मुलगी झिवाने जिंकली विरुष्काच्या स्वागत समारंभात पाहुण्यांची मने

मुंबई । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री यांच्या लग्नाचा स्वागत समारंभ काल मुंबापुरीत झाला. यावेळी माजी कर्णधार एमएस धोनीची मुलगी झिवा सिंग धोनीने उपस्थितांची मने जिंकली.

याचा विडिओ आज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. जेव्हा धोनीने या समारंभस्थळी आगमन केले तेव्हा त्याने उपस्थितांना हातवारे करत ओळख दिली तसेच तो पुढे चालत गेला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या झिवाने देखील धोनीप्रमाणे सर्वांना हातवारे केले.

Video:

यापूर्वीही झिवाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे इंस्टाग्रामवर अकाउंट असून त्यावर अनेक विडिओ आणि फोटो शेअर केले जातात. झिवा त्यात कधी मल्याळम गाणे म्हणताना तर कधी ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना दिसते.

विराट-अनुष्काचा लग्न समारंभ ११ डिसेंबर रोजी तर पहिला स्वागत समारंभ दिल्ली येथे २१ डिसेंबर रोजी झाला होता. मुंबईमध्ये हे खास बॉलीवूड आणि क्रिकेटपटूंसाठी खास रिसेप्शन होते.