Video: शोएब मलिक आणि एमएस धोनी यांच्या सरावादरम्यान रंगल्या गप्पा  

भारत आणि पाकिस्तान संघाचे सरावसत्र शुक्रवारी सायंकाळी आयसीसीच्या दुबई येथील ट्रेनिंग अकॅडमी वर आयोजित केले होते. दोन्ही संघाचे खेळाडू सराव करण्यात व्यस्त होते.

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि खेळाडू शोएब मलिक याने सराव करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली. त्यावेळी तेथे भारताचा अशिया चषकासाठीचा प्रभारी कर्णधार रोहीत शर्मा हा देखील होता.

पाकिस्तानच्या संघात शोएब मलिक हा सर्वात अनुभवी असून त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. धोनीही भारतासाठी त्याच भूमिकेत खेळणार आहे.

पाकिस्तान आणि भारत यांचा सामना आशिया चषकात 19 सप्टेंबरला होणार आहे. त्याआधी दोन्ही संघ आपापले सामने हाँगकाँग सोबत अनुक्रमे 16 आणि 18 सप्टेंबरला खेळणार आहेत.

पाकिस्तानचा संघ ह्या मालिकेसाठी फेव्हरेट मानला जात असून, भारताने ही स्पर्धा आजवर 6 वेळा जिंकली आहे. गतविजेता भारतीय संघ फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात मजबूत असून आपले विजयी अभियान कायम राखण्यास प्रयत्न करणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशिया कप २०१८: एमएस धोनीच्या नावावर आहे हा खास विक्रम

सॅफचे आठवे विजेतेपद जिंकण्यास भारतीय संघ सज्ज

एशिया कप २०१८ स्पर्धेबद्दल सर्वकाही