Video: अंदर ही रह चीकू, जेव्हा धोनीच देतो कर्णधार कोहलीला आदेश!

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा फिरकी गोलंदाज जेव्हा बऱ्याच वेळा क्षेत्ररक्षण लावताना दिसतो. ३०० पेक्षा अधिक वनडे सामने खेळलेल्या या दिग्गजाच्या मार्गदर्शनाचा संघाला सतत फायदा होत असतो.

धोनी हा अतिशय चलाख कर्णधार म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये ओळखला जायचा. आजही तो बऱ्याच वेळा कर्णधार कोहलीशी चर्चा करत संघाच्या हितासाठी निर्णय घेताना दिसतो.

सेंच्युरियन वनडेत धोनी आणि अन्य खेळाडूंमधील हे संभाषण हे स्टंपजवळील कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे. याचा खास विडिओ SPNSportsIndiaने युट्युबवर शेअर केला आहे. त्यात धोनी कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, युझवेन्द्र चहल या खेळाडूंना मार्गदर्शन करताना तसेच कशी गोलंदाजी करावी याबद्दल सांगताना दिसत आहे.

तसेच एका फुटेजमध्ये तो विराटला म्हणतो, ” अंदर ही रह चीकू, ये खेलता हैं उधर!”

पहा हा संपूर्ण विडिओ:

धोनीचे आजपर्यंत गोलंदाजांबरोबर संभाषणाचे अनेक विडिओ आजपर्यंत समोर आले आहे. धोनी जेव्हा समोरील फलंदाज इंग्रजी भाषा बोलणार असतो तेव्हा भारतीय गोलंदाजांबरोबर हिंदी भाषेत संभाषण करतो तर सामना पाकिस्तान. श्रीलंका किंवा बांगलादेश बरोबर असेल तर बऱ्याच वेळा इंग्रजी भाषेत संभाषण करताना दिसला आहे.

धोनीच्या ह्याच वेगेवगेळ्या परिस्थितीमधील संभाषणाची एक खास रेकॉर्ड बनवून जरी नवोदित फिरकी गोलंदाज किंवा यष्टिरक्षकांना ऐकवली तरी ते एक मोठे विद्यापीठ ठरेल अशा त्या खास रेकॉर्डिंग आहेत.

असे असले तरी धोनीनेच याची एकदा तक्रार केली होती की जेव्हा भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असतो तेव्हा स्टंपजवळील माईकचा आवाज हा थोडा जास्तच ठेवला जातो त्यामुळे आमच्या योजना ह्या जगासमोर येतात.