Video: जेव्हा धोनी बनतो श्रीलंका संघाचा हेडमास्तर

भारतीय संघाचा माजी कॅप्टन कूल आणि सध्याचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी त्याच्या कर्णधार आणि यष्टिरक्षणाच्या अनोख्या शैलीमुळे जगात ओळखला जातो. सध्या कर्णधार पदावर नसूनही धोनी बऱ्याच वेळा संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसतो.

धोनी हा भारतीय क्रिकेट संघातील सध्याचा सर्वात जास्त वनडे आणि कसोटी सामने खेळलेला खेळाडू आहे. असा हा महान खेळाडू भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसला.

जेव्हा सामना संपल्यावर संजय मांजरेकर श्रीलंकेचा कर्णधार थिसारा परेराची मुलाखत घेत होते तेव्हा धोनी अकिला धनंजया, उपुल थरांगा आणि सदिरा समरवीरा यांना फलंदाजीचे मार्गदर्शन करताना दिसला.

धोनीच्या अनुभवाचा भारतीय संघाला कायम उपयोग होत आलेला आहे. त्यामुळेच २०१९च्या विश्वचषकात धोनी हवाच असे मत प्रशिक्षक रवी शात्री, कर्णधार विराट कोहली आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे.