पहा शिखर धवनचा हा खास डान्स !

काल भारताच्या शिखर धवनला कसोटी मालिकेत मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. धवनने या मालिकेत ८९.५०च्या सरासरीने तब्बल ३५८ धावा केल्या. त्यात त्याच्या दोन शतकांचा समावेश आहे.

क्रिकेट समालोचक रोशन अभयसिंगे यांनी जेव्हा या पुरस्कारासाठी शिखर धवनच्या नावाची घोषणा केली तेव्हा मंचाकडे जाताना शिखरने एक हटके डान्स केला. मुरली विजय दुखापतग्रस्त झाल्यामुळे शिखर धवनला या मालिकेत संधी मिळाली होती. अचानक मिळालेल्या या संधीचे त्याने सोने केले.

जेव्हा या खेळाडूला या मालिकेसाठी बोलावण्यात आले होते तेव्हा तो हॉंगकॉंग वरून ऑस्ट्रेलियाला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी रवाना होत होता. परंतु अचानक आलेल्या कॉलमुळे धवनला या मालिकेत खेळता आले. यापुढे हा खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीराच्या जागी एक प्रबळ दावेदार असेल.

https://twitter.com/kishorVineet/status/897036475002363906